Posts By :

aces

संत गाडगे महाराज यांचे सामाजिक कार्य : एक संशोधन 150 150 aces
संत गाडगे महाराज यांचे सामाजिक कार्य : एक संशोधन
संत गाडगे महाराज यांचे सामाजिक कार्य : एक संशोधन

सचिन रा. मेश्राम
सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग
भिवापूर महाविद्यालय भिवापूर, नागपूर

Published in March 2026
सारांश

संत गाडगे महाराज (१८७६–१९५६) हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि नैतिक परिवर्तनाचे अग्रदूत मानले जातात. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता समाजातील दैन्य, अज्ञान, अंधश्रद्धा आणि असमानता यांचा नाश करून स्वच्छतेचा, श्रमसंस्कृतीचा व शिक्षणाचा प्रसार करणे. संशोधनाच्या दृष्टीने पाहिल्यास, गाडगे महाराजांचे कार्य पारंपरिक संतविचारापेक्षा व्यावहारिक सामाजिक सुधारणा आणि मानवतावादी कृतीवर अधिक आधारित होते. त्यांनी प्रवचन, भजन, कीर्तन यांसारख्या सांस्कृतिक साधनांचा वापर समाजजागृतीसाठी केला, परंतु त्यांचे मुख्य योगदान प्रत्यक्ष कृतीतून दिसते—गावोगाव फिरून त्यांनी रस्ते, विहिरी, स्मशानभूमी, धर्मशाळा व शाळांची उभारणी केली.
अस्पृश्यता, जातीभेद आणि धार्मिक आडाखे यांवर त्यांची तीव्र टीका होती. त्यांच्या मते “धर्म म्हणजे माणुसकी” आणि “सेवा हीच उपासना” हे विचार सामाजिक सुधारणा चळवळीचे वैचारिक आधारस्तंभ ठरतात. संशोधनातून दिसते की गाडगे महाराजांनी समाजातील संसाधनांचे समतोल वापर आणि लोकसहभागावर भर दिला. समाजकार्यात त्यांनी दानधर्म स्वीकारला नाही, तर श्रमदान व जबाबदारीची संस्कृती बिंबवली. त्यामुळे त्यांच्या चळवळीला वर्णनात्मक स्वरूपापेक्षा क्रियात्मक आणि जनसहभागी मूल्य मिळाले.
स्वच्छतेच्या मोहिमांद्वारे त्यांनी सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणजागर यांची पायाभरणी केली; हे कार्य आजच्या स्वच्छ भारत अभियानाच्या मूल्यांशी साम्य दर्शवते. अभ्यासातून असेही दिसून येते की त्यांच्या कीर्तनांमध्ये सामाजिक संदेश, विवेकवाद आणि शिक्षणाची आवश्यकता यांचे सातत्याने प्रतिपादन केले जाते. त्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या शैक्षणिक संस्था, वसतिगृहे आणि धर्मशाळा आजही त्यांच्या सेवाभावाच्या वारशाचे साक्षीदार आहेत.
अशा प्रकारे, संत गाडगे महाराजांचे सामाजिक कार्य हे फक्त आध्यात्मिक उपदेश नसून प्रत्येक कृतीतून समाजपरिवर्तन घडविणारी एक सशक्त प्रयोगशील चळवळ होती. त्यांच्या कार्याचा अभ्यास आधुनिक सामाजिक सुधारणा, जनसहभाग आणि मानवतावादी मूल्यांच्या दृष्टीने आजही संदर्भयोग्य ठरतो

औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांचे श्रमिक हक्क व वास्तव: एक अभ्यास 150 150 aces
औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांचे श्रमिक हक्क व वास्तव: एक अभ्यास
धर्मांतरित बौद्ध महिलांच्या सामाजिक समस्या व सक्षमीकरण

श्री. शामराव तभाने
संशोधक विद्यार्थी
अर्थशास्त्र विभाग
पदव्युत्तर शिक्षण विभाग,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,
नागपूर, जिल्हा- नागपूर

डॉ. गजानन सोमकुवर
मार्गदर्शक
बॅ. शेषराव वानखेडे महाविद्यालय,
खापरखेडा

Published in March 2026
सारांश

भारताच्या ऊर्जा क्षेत्रात औष्णिक वीज प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावतात. देशाच्या औद्योगिक, कृषी आणि शहरी विकासासाठी आवश्यक असलेली वीज औष्णिक वीज प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात निर्माण होते. या प्रकल्पांमध्ये विविध तांत्रिक आणि श्रम-केंद्रित कामांसाठी मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार काम करतात. उदारीकरण आणि खाजगीकरण धोरणांमुळे, कायमस्वरूपी रोजगाराऐवजी कंत्राटी कामगारांची संख्या वाढली आहे.
या संशोधन पत्रात औष्णिक वीज प्रकल्पांमधील कंत्राटी कामगारांचे कामगार हक्क आणि वास्तवांचा अभ्यास केला आहे. विद्यमान कामगार कायदे, किमान वेतन, कामाचे तास, सामाजिक सुरक्षा आणि कंत्राटी कामगारांसाठी आरोग्य आणि सुरक्षा सुविधांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला आहे. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की कायद्यांमध्ये स्पष्ट तरतुदी असूनही, त्यांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत लक्षणीय तफावत आहे. अनेक कंत्राटी कामगारांना किमान वेतन, ओव्हरटाइम वेतन, सामाजिक सुरक्षा योजनेचे फायदे आणि सुरक्षित कामाचे वातावरण मिळत नाही.
कमी वेतन, नोकरीची असुरक्षितता आणि सामाजिक संरक्षणाचा अभाव यामुळे कंत्राटी कामगारांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती कमकुवत होत आहेत. ही परिस्थिती त्यांच्या कुटुंबांच्या राहणीमानावर देखील नकारात्मक परिणाम करते. ऊर्जा क्षेत्राच्या शाश्वत आणि संतुलित विकासासाठी, कंत्राटी कामगारांच्या कामगार हक्कांची योग्य अंमलबजावणी करणे आणि त्यांचे राहणीमान सुधारणे आवश्यक आहे.

धर्मांतरित बौद्ध महिलांच्या सामाजिक समस्या व सक्षमीकरण 150 150 aces
धर्मांतरित बौद्ध महिलांच्या सामाजिक समस्या व सक्षमीकरण
धर्मांतरित बौद्ध महिलांच्या सामाजिक समस्या व सक्षमीकरण

श्री. संजय चंद्रभान मेश्राम
संशोधनकर्ता

प्रा. डॉ. विठ्ठल चव्हाण
मार्गदर्शक
समाजशास्त्र विभाग प्रमुख,
आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय,
देसाईगंज (वडसा) जि. गडचिरोली

Published in March 2026
सारांश

1956 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या धर्मांतरामुळे दलित समाजाला सामाजिक समता, मानवी प्रतिष्ठा व स्वाभिमान मिळविण्याची दिशा प्राप्त झाली. या परिवर्तन प्रक्रियेत धर्मांतरित बौद्ध महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. तथापि, धर्मांतरानंतरही या महिलांना विविध सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रस्तुत संशोधनात धर्मांतरित बौद्ध महिलांच्या सामाजिक समस्या व त्यांच्या सक्षमीकरणाच्या प्रक्रियेचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे.
प्रस्तुत संशोधनात शिक्षणाचा अभाव, आर्थिक दुर्बलता, रोजगाराची असुरक्षितता, सामाजिक भेदभाव, कौटुंबिक हिंसाचार आणि आरोग्यविषयक समस्या या प्रमुख अडचणींचे विश्लेषण करण्यात आले आहे. पितृसत्ताक मानसिकता व जातीय पूर्वग्रहांमुळे महिलांच्या सामाजिक सहभागावर मर्यादा येताना दिसतात. धर्मांतरामुळे वैचारिक मुक्तता व आत्मसन्मान मिळाला असला तरी सामाजिक वास्तवात परिवर्तनाची गती संथ असल्याचे आढळते. सक्षमीकरणाच्या दृष्टीने शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, कायदेशीर जागृती, आरोग्य सुविधा आणि राजकीय सहभाग या घटकांवर विशेष भर देण्यात आला आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ उपलब्ध असला तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. या संशोधनातून असे निष्कर्ष निघतात की, धर्मांतरित बौद्ध महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण साधण्यासाठी शासन, समाज व स्वयंसेवी संस्थांचे संयुक्त प्रयत्न अत्यावश्यक आहेत.

कृषी यांत्रिकीकरणाचा विदर्भातील पिकांच्या उत्पादनावर प्रभाव : एक अभ्यास 150 150 aces
कृषी यांत्रिकीकरणाचा विदर्भातील पिकांच्या उत्पादनावर प्रभाव : एक अभ्यास
बौद्धिक संपदा हक्क : एक अभ्यास

श्री. रजत ज्ञानेश्वर मुळे
संशोधक विद्यार्थी
अर्थशास्त्र विभाग
पदव्युत्तर शिक्षण विभाग,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,
नागपूर, जिल्हा- नागपूर

डॉ. गजानन पाटील
मार्गदर्शक
अन्नासाहेब गुंडेवार महाविद्यालय, नागपूर

Published in March 2026
सारांश

विदर्भ हा महाराष्ट्रातील कृषीप्रधान व तुलनेने मागासलेला प्रदेश असून येथील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, भात इत्यादी प्रमुख पिकांचे उत्पादन विदर्भात घेतले जाते. मात्र अनियमित व अल्प पर्जन्यमान, मर्यादित सिंचन सुविधा, लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्राबल्य, वाढती मजुरी, शेतीमजुरांची कमतरता आणि पारंपरिक शेतीपद्धती यांमुळे विदर्भातील कृषी उत्पादन व उत्पादकता अपेक्षित पातळीपर्यंत पोहोचलेली नाही. अशा परिस्थितीत कृषी यांत्रिकीकरण हे शेती विकासाचे एक महत्त्वाचे साधन ठरले आहे.
कृषी यांत्रिकीकरण म्हणजे शेतीच्या विविध टप्प्यांमध्ये मानवी व पशुश्रमांच्या जागी किंवा त्यांच्यासोबत आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करणे होय. प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये विदर्भातील कृषी यांत्रिकीकरणाची सद्यस्थिती, त्याचा पिकांच्या उत्पादन, उत्पादकता व उत्पादन खर्चावर होणारा प्रभाव, तसेच पारंपरिक व यांत्रिक शेतीपद्धतीतील फरकांचा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासासाठी प्रामुख्याने द्वितीयक माहितीचा वापर करून वर्णनात्मक व विश्लेषणात्मक पद्धतीने संशोधन करण्यात आले आहे.
अभ्यासातून असे आढळून येते की कृषी यांत्रिकीकरणामुळे शेतीतील कामे वेळेवर पूर्ण होऊन पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढली आहे. यंत्रांच्या वापरामुळे श्रम उत्पादकतेत सुधारणा झाली असून दीर्घकालीन दृष्टिकोनातून उत्पादन खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. तथापि, अल्पभूधारणा, आर्थिक मर्यादा व तांत्रिक ज्ञानाचा अभाव यांमुळे यांत्रिकीकरणाचा लाभ सर्व शेतकऱ्यांपर्यंत समानरीत्या पोहोचलेला नाही. त्यामुळे विदर्भातील कृषी विकासासाठी प्रभावी धोरणे, आर्थिक सहाय्य व प्रशिक्षणाची आवश्यकता अधोरेखित होते.

बौद्धिक संपदा हक्क : एक अभ्यास 150 150 aces
बौद्धिक संपदा हक्क : एक अभ्यास
बौद्धिक संपदा हक्क : एक अभ्यास

प्रा. डॉ. अनिल बोपचे
मराठी विभाग प्रमुख
डॉ. अरुण मोटघरे महाविद्यालय,
कोंढा- कोसरा,ता. पवनी, जि. भंडारा

Published in March 2026
सारांश

बौद्धिक संपदा हक्क ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. या हक्क अंतर्गत मालकास व कार्याची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीस त्याच्या नवनिर्मित कार्याचे हक्क सहजरित्या मिळते. या अधिकारामुळे कोणालाही निर्मात्याच्या संमतीशिवाय त्याने निर्मिती केलेल्या साहित्याचा वापर करता येत नाही. याचाच अर्थ हा की, नवीन शोध करणाऱ्या व्यक्तीने एका निर्मिती करणाऱ्या व्यक्तीच्या संमतीशिवाय अपहार किंवा त्याचा वापर करण्याच्या विरुद्ध बौद्धिक संपदा हक्कानुसार अधिकार प्राप्त करून देते. आजच्या घडीला प्रत्येक देशाने बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Rights) हा कायदा संमत करून घेतलेला आहे. किंबहुना आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा ‘विश्व बौद्धिक संपदा संघटना’ कार्यरत आहे. या संघटनेने औद्योगिक आराखडा, मानवी प्रयत्नांच्या सर्व क्षेत्रांत शोध घेणे, साहित्यिक, कलात्मक व शास्त्रीय कार्य, शास्त्रीय शोध, औद्योगिक, शास्त्रीय, साहित्यिक, कलात्मक क्षेत्रातील हक्क, व्यापार चिन्ह, सेवेंचे चिन्ह, व्यापारी नाव व हुद्दा इ. चा बौद्धिक संपदा हक्कात समावेश केला आहे.

रोजगाराचे भविष्य स्वयंचलीत जगात मानवी सन्मान 150 150 aces
रोजगाराचे भविष्य स्वयंचलीत जगात मानवी सन्मान
रोजगाराचे भविष्य स्वयंचलीत जगात मानवी सन्मान

डॉ.राजेश गोमाजी वालोदे
सहयोगी प्राध्यापक एम. बी. पटेल
कॉलेज साकोली जि. भंडारा

Published in March 2026
सारांश

भारत हा कृषी प्रधान देश असून तो विविध विभागात विभागला आहे. त्यात अनेक राज्य असून प्रत्येक राज्यात मोठ्या प्रमाणात लघु व कुटीर उद्योग चालत असतात. त्यातुनच मोठ्या प्रमाणात उद्याजकता निर्माण होत आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे व त्यात नवीननवीन तंत्रज्ञानाचा वापर हा उद्योगात केला जातो. उद्योगाच्या मार्गातूनच रोजगार उपलब्ध होत असतो. आज चे युग हे स्वयंचलीत जग आहे त्यात स्वयंचलीत जगात मानवाला रोजगाराद्वारे सन्मान प्राप्त करावयाचे आहे.
२१ वे शतक हे तंत्रज्ञानाच्या क्रांतीचे शतक आहे. आजचे युग हे तांत्रिक व नवनिर्मीतीचे युग आहे अशावेळी मानवी श्रमाचे मूल्य व सन्मान रोजगाराचे माध्यमातून टिकून राहील हा एक प्रश्न आहे.
शिक्षण, आरोग्य, शेती, बांधकाम, लघुउद्योग, कुटीरउद्योग, हस्तव्यवसाय दुय्यम उद्योगज्यात पशुपालन, दुग्धपालन, मत्स्थव्यवसाय व इतर उद्यागाद्वारे रोजगाराचा समावेश केला जातो शेतीच्याद्वारे आज अनेक दुय्यम उद्योग घेतले जातात व त्याद्वारे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध घेत असतो. तसेच शहरी भागात उद्योगधंद्याच्या मार्फत रोजगार घेत असतो.

शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील व्यावसायिक मूल्ये आणि नैतिक जबाबदाऱ्या 150 150 aces
शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील व्यावसायिक मूल्ये आणि नैतिक जबाबदाऱ्या
शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील व्यावसायिक मूल्ये आणि नैतिक जबाबदाऱ्या

प्रा. डॉ. उदय मेंडुलकर
संचालक
शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग
राष्ट्रसंत तुकडोजी कॉलेज चिमूर

Published in March 2026
सारांश

प्रगती आणि विकासाला स्वतःच्या काही मर्यादा असतात. एखादा विषय कोणत्याही प्रमाणात विकसित होऊ शकतो परंतु त्याच्या विकासाच्या काही मर्यादा असतात तसेच त्याचा मार्ग ठरवतात आणि त्याचे अनुसरण करणे आवश्यक असते. खरंच, शारीरिक शिक्षण आणि खेळाचा प्रसार व विकास होण्याची गरज आहे परंतु त्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे समझणे फार गरजेचे आहे . शारीरिक शिक्षणातील नीतिमत्तेचे पूर्णतः आणि जवाबदारी ने पालन करायला पाहिजे. आजकाल शारीरिक शिक्षण आणि खेळ हा एक उद्योग बनला आहे, लोक खेळात पैसे गुंतवतात आणि म्हणूनच खेळाचे बाजारीकरण झाले दिसून येत आहे.
आता प्रश्न असा आहे की नीतिमत्ता या शब्दाचा खरा अर्थ काय असू शकतो ? नीतिमत्ता हे नैतिकतेचे शास्त्र आहे, म्हणजेच ते नैतिकतेशी संबंधित असते. योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे ? कसे वागावे, या वर व्यावहारिक शिफारसी देते. वर्तमाणतील खेळ खूप स्पर्धात्मक झालेले आहे असे दिसून येतो आणि शारीरिक शिक्षणाच्या व्यावसायिकांसाठी हे गरजेचे आहे की त्यांचे निर्णय क्रीडा आणि शारीरिक शिक्षणावर परिणाम करू शकतात.
नीतिमत्ता ही एक मार्गदर्शक तत्व आहे आणि त्याचे पालन करणे अनिवार्य असते, म्हणजेच चूक की बरोबर हे समझून घेणे महत्वाचे असते. शारीरिक शिक्षण व्यावसायिकाला खेळाडूच्या उन्नतीसाठी, दर्जा उंचावण्यासाठी आणि स्वतःला समर्पित करण्यासाठी काम करावे लागते. येथे नीतिमत्ता विचारात घेतली जाते. जर एखादा व्यावसायिक सेवा देत असेल आणि स्वतःच्या आवडीचा त्याग करत असेल, परंतु तो खरोखरच खेळाडूंची काळजी घेत आहे की नाही, तो योग्य रीतीने आणि मर्यादेत काम करतो की नाही, हे जाणुनू घेणे आवश्यक आहे.
शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात अनेक नियम आणि कायदे आहेत. एखादा व्यवसाइकाला खेळाचे पालन करणे आवयशयक असते. प्रशिक्षक हा खेळाडूंच्या खेळ कौशल्यावर विशेष भर देतो आणि खेळाडूना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करतो. खेळाडूंच्या विकासा होण्या करिता सदैव तत्पर असतो आणि पुडील येणाऱ्या अडचणीला समोर जातो आणि हे त्याचे नैतिक कर्तव्य आहे.
उदाहरणार्थ खेळांमध्ये सराव करताना खेळाडूला जर दुखापत झाली असता त्याचे प्राथमिक उपचार करणे व त्या बद्दल माहिती देणे आवश्यक असते आणि ही त्याची नैतिक जवाबदारी आहे.

भारतातील बौद्धिक संपदा अधिकारांची भूमिका आणि आव्हाने 150 150 aces
भारतातील बौद्धिक संपदा अधिकारांची भूमिका आणि आव्हाने
भारतातील बौद्धिक संपदा अधिकारांची भूमिका आणि आव्हाने

डॉ. मंगेश गोविंदराव आचार्य
सहयोगी प्राध्यापक तथा राज्यशास्त्र विभाग प्रमुख
अंत्योदय विज्ञान संस्था व संशोधन केंद्र देवग्राम

Published in March 2026
सारांश

भारतात नाविन्यपूर्ण संशोधन, कल्पकता आणि व्यावसायिक हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठीबौद्धिक संपदा अधिकारांची (IPR)भूमिका अत्यंत महत्वाची आहे. हे अधिकार प्रामुख्याने पेटंट कायदा १९७०, ट्रेडमार्क कायदा १९९९, आणि कॉपीराइट कायदा १९५७ यांसारख्या वैधानिक चौकटींद्वारे नियंत्रित केले जातात. भारत जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) ‘ट्रिप्स’ (TRIPS)कराराचा सक्रिय सहभागी असल्याने, येथील कायदे आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत करण्यात आले आहेत, ज्यामुळे परकीय गुंतवणूक आकर्षित होण्यास आणि देशांतर्गत उद्योगांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्यास मदत होत आहे. २०१६ चेराष्ट्रीय आयपीआर धोरणहे या क्षेत्रातील आधुनिकिकरणाचा मुख्य पाया असून, त्याअंतर्गत नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी ‘फास्ट-ट्रॅक प्रोसेसिंग’ व डिजिटल साधनांचा वापर सुरू करण्यात आला आहे. परंतुभारतीय आयपीआर प्रणालीसमोरकमकुवत अंमलबजावणी, पायरसी, बनावट वस्तूंचा सुळसुळाट आणि नोंदणी प्रक्रियेतीलप्रशासकीय विलंबही मोठी आव्हाने आहेत. विशेषतः लघु उद्योगांमध्ये (MSMEs) जनजागृतीचा अभाव आणि कायदेशीर अंमलबजावणीतील त्रुटींमुळे संशोधकांना व्यावसायिक संधींचे नुकसान सोसावे लागते. या समस्यांवर मात करण्यासाठीविशेष आयपीआर न्यायालयेस्थापन करणे, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करणे आणि ‘पारंपारिक ज्ञान डिजिटल लायब्ररी’ (TKDL) द्वारे जैवविविधतेचे रक्षण करणे आवश्यक आहे.

बौद्धिक संपदा हक्क: संकल्पना, स्वरूप व महत्त्व 150 150 aces
बौद्धिक संपदा हक्क: संकल्पना, स्वरूप व महत्त्व
बौद्धिक संपदा हक्क: संकल्पना, स्वरूप व महत्त्व

प्रा.डॉ.किशोर जगन्नाथ शेंडे
श्री.लेमदेव पाटील महाविद्यालय, मांढळ

Published in March 2026
सारांश

ज्ञान, नवोन्मेष आणि सर्जनशीलता या आधुनिक अर्थव्यवस्थेच्या प्रमुख शक्ती मानल्या जातात. मानवी बुद्धीने निर्माण केलेल्या कल्पना, शोध, कलाकृती, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे संरक्षण करण्यासाठी बौद्धिक संपदा हक्क ही एक प्रभावी कायदेशीर व्यवस्था आहे. जागतिकीकरण, तंत्रज्ञानातील प्रगती, डिजिटल माध्यमांचा विस्तार आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर बौद्धिक संपदा हक्कांला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बौद्धिक संपदा हक्कांमुळे संशोधक, लेखक, कलाकार, उद्योजक आणि उद्योगांना त्यांच्या सर्जनशीलतेचे संरक्षण मिळते तसेच नवोन्मेषाला प्रोत्साहन मिळते.
प्रस्तुतसंशोधन पेपरमध्ये बौद्धिक संपदा हक्कांची संकल्पना, ऐतिहासिक पार्श्वभूमी, विविध प्रकार, स्वरूप आणि आर्थिक-सामाजिक महत्त्व यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. तसेच भारतातील बौद्धिक संपदा हक्क व्यवस्थेचा विकास, आंतरराष्ट्रीय करारांचा प्रभाव आणि विकासशील देशांच्या दृष्टीने बौद्धिक संपदा हक्कांचे स्थान याचे विश्लेषण करण्यात आले आहे. बौद्धिक संपदा हक्कांमुळे होणारे फायदे तसेच त्यातून निर्माण होणारे सामाजिक व आर्थिक प्रश्न यांचा समतोल अभ्यास करून, समावेशक आणि विकासाभिमुख बौद्धिक संपदा हक्क व्यवस्थेची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

बौद्धिक संपदा हक्क आणि भारतीय संदर्भात महत्व 150 150 aces
बौद्धिक संपदा हक्क आणि भारतीय संदर्भात महत्व
बौद्धिक संपदा हक्क आणि भारतीय संदर्भात महत्व

प्रा. मोरेश्वर काशिनाथ मडावी
संचालक, शारीरिक शिक्षण व क्रिडा विभाग
डॉ.अरुण मोटघरे महाविद्यालय, कोंढा-कोसरा
ता. पवनी जिः भंडारा

Published in March 2026
सारांश

बौद्धिक संपदा हक्क आणि भारतीय संदर्भात् महत्व” या शिर्षकाच्या प्रस्तुत शोधनिबंधामध्ये बौद्धिक संपदेच्या हक्काचा परिचय, महत्व आणि आवश्यकतेचा वर्णन केलेला आहे. याबरोबर बौद्धिक संपदा हक्कांच्या अंतर्गत येणाऱ्या विवीध प्रकाराच्या क्षेत्राला विविध विभागात विभागलेला आहे. मानसाला त्याच्या बौध्दिक सृजनशिलतेची सुरक्षा पुरविण्याचा हक्क देणे यालाच बौध्दिक संपदा हक्क असे संबोधतात. असे समजले जाते की, जर एखादी व्यक्ती कोणत्या प्रकारचा बौध्दि‌क सृजन (जसे साहित्याची रचना, कृतीची रचना, शोध, अविष्कार इत्यादी) करतो तर सर्वप्रथम त्यावर त्याच व्यक्तीचा एकमात्र अधिकार असायला पाहिजे कारण हे हक्क बौध्दिक सृजनतेला दिलेले आहेत. बौद्धिक संपदा हक्कामुळे निर्माणकर्त्याच्या सृजनशिलतेचा अनधिकृतरित्या वापर, नकल (कॉपी) आणि चोरीपासून सुरक्षा करते बौद्धिक संपदा हक्क अज्ञानतेमुळे व अकार्यक्षम अशा अमलबजावणीमुळे देशाच्या तांत्रिक, आर्थिक आणि समाजाच्या विकासाकरिता घातक ठरु शकते. त्यामुळे या हक्काविषयी ज्ञानाचा प्रसार करुन, योग्य ती अमलबजावणी कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यावश्क आहे.