बौद्धिक संपदा हक्क : एक अभ्यास
प्रा. डॉ. अनिल बोपचे
मराठी विभाग प्रमुख
डॉ. अरुण मोटघरे महाविद्यालय,
कोंढा- कोसरा,ता. पवनी, जि. भंडारा
Published in March 2026
सारांश
बौद्धिक संपदा हक्क ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. या हक्क अंतर्गत मालकास व कार्याची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीस त्याच्या नवनिर्मित कार्याचे हक्क सहजरित्या मिळते. या अधिकारामुळे कोणालाही निर्मात्याच्या संमतीशिवाय त्याने निर्मिती केलेल्या साहित्याचा वापर करता येत नाही. याचाच अर्थ हा की, नवीन शोध करणाऱ्या व्यक्तीने एका निर्मिती करणाऱ्या व्यक्तीच्या संमतीशिवाय अपहार किंवा त्याचा वापर करण्याच्या विरुद्ध बौद्धिक संपदा हक्कानुसार अधिकार प्राप्त करून देते. आजच्या घडीला प्रत्येक देशाने बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Rights) हा कायदा संमत करून घेतलेला आहे. किंबहुना आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा ‘विश्व बौद्धिक संपदा संघटना’ कार्यरत आहे. या संघटनेने औद्योगिक आराखडा, मानवी प्रयत्नांच्या सर्व क्षेत्रांत शोध घेणे, साहित्यिक, कलात्मक व शास्त्रीय कार्य, शास्त्रीय शोध, औद्योगिक, शास्त्रीय, साहित्यिक, कलात्मक क्षेत्रातील हक्क, व्यापार चिन्ह, सेवेंचे चिन्ह, व्यापारी नाव व हुद्दा इ. चा बौद्धिक संपदा हक्कात समावेश केला आहे.