ग्रामीण व शहरी भागातील लोकांच्या दैनंदिन जीवनात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे स्थान: नागपूर विभागाच्या संदर्भात

ग्रामीण व शहरी भागातील लोकांच्या दैनंदिन जीवनात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे स्थान: नागपूर विभागाच्या संदर्भात 150 150 aces
ग्रामीण व शहरी भागातील लोकांच्या दैनंदिन जीवनात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे स्थान: नागपूर विभागाच्या संदर्भात

श्री. अमोल विठोबाजी भगत
संशोधक विद्यार्थी
अर्थशास्त्र विभाग
पदव्युत्तर शिक्षण विभाग,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,
नागपूर, जिल्हा- नागपूर

प्रा. डॉ. सुनिल शिंदे
मार्गदर्शक
भिवापूर महाविद्यालय,
भिवापूर जि. नागपूर

Published in March 2026
सारांश
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतुकीची सर्वात महत्त्वाची संस्था असून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात तिची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नागपूर विभागातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये प्रवासाची गरज, सामाजिक व्यवहार, रोजगार, शिक्षण, आरोग्य सेवा आणि बाजारपेठेत सहभागी होण्याची संधी या सर्वांमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवांचा थेट परिणाम दिसतो. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवन अत्यंत वाहतुकीवर अवलंबून असते, विशेषतः शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, शेतकरी व मजुरांसाठी बाजारपेठेत पोहोचण्यासाठी, तसेच आरोग्य सेवा व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही जीवनवाहिनी ठरते.
शहरी भागातही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आर्थिकदृष्ट्या परवडणारी, पर्यावरणपूरक आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त वाहतूक सुविधा उपलब्ध करून देते. प्रस्तुत संशोधनामध्ये नागपूर विभागातील ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांच्या दैनंदिन जीवनात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सामाजिक व आर्थिक प्रभाव अभ्यासला आहे. प्राथमिक माहिती (प्रवासी निरीक्षण, मुलाखती) आणि दुय्यम माहिती (राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा अहवाल, शासकीय प्रकाशने, संशोधन लेख) या माध्यमातून सेवा वापर, प्रवासी अपेक्षा, आर्थिक बचत, रोजगारनिर्मिती, आणि सामाजिक समावेशन यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. निष्कर्ष दर्शवितात की ग्रामीण भागात MSRTC ही जीवनावश्यक सेवा आहे तर शहरी भागात ती सहाय्यक आणि पर्यावरणपूरक सुविधा म्हणून कार्य करते. राज्य मार्ग परिवहन महामं%E